आजची वात्रटिका
-------------------------
दुकानदारी
ज्यांची ज्यांची दारुची दुकानं
त्यांचीच शिक्षणाची दुकानं आहेत.
त्यांच्यासाठी पैसा कमवायची
दोन्हीही सारखीच ठिकाणं आहेत.
ज्यांच्या त्यांच्या गरजा अशा
गावागावात पूरवू लागले !
शिक्षणसम्राट कम मद्यसम्राट
समाजसेवेचा कंड जिरवू लागले !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-----------------------------
फेरफटका-2898
दै.झुंजार नेता
1 फेब्रुवारी 2008
-
No comments:
Post a Comment