Tuesday, November 10, 2026

नोटांचा संवाद... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
---------------------------

नोटांचा संवाद

पाचशेची म्हणाली हजाराचीला,
तुझी माझी आता रद्दी आहे.
अर्थतज्ञाला नव्हती तेवढी,
चहावाल्याला बुद्धी आहे.

धक्क्यावर धक्के बसले तरी,
घाबरायचे काहीच कारण नाही.
काळ्या पैश्यावाल्यांना भीती,
इमानदारांना नाही.

व्यवहारात परीणाम होतील,
पण घरच्या घरी आहेर आहेत.
बायकांनी नव-यापासून दडवलेल्या
सगळ्या नोटा आता बाहेर आहेत.

मी घेणार नवे रूप,
तुला मात्र दुसर्यांदा चंदन आहे !
अगदी विरोधकांकडूनसुद्धा
सरकारचे अभिनंदन आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
--------------------------------
फेरफटका-6054
दैनिक झुंजार नेता
9नोव्हेंबर 2016
-------------------------------
माझ्या फेरफटका या सदरातील हजारो वात्रटिका
वाचण्यासाठी आणि इतरांना
शेअर करण्यासाठी क्लिक करा.
http://suryakantdolase.blogspot.com

No comments:

नोटांचा संवाद... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------------- नोटांचा संवाद पाचशेची म्हणाली हजाराचीला, तुझी माझी आता रद्दी आहे. अर्थतज्ञाला नव्हती ...