Monday, November 9, 2026

मुहूर्त... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
----------------------

मुहूर्त

शाहू-फुले-आंबेडकर वापरून,
विधानसभा कशीबशी जिंकली.
शपथविधीला मात्र,
मुहूर्ताची माशी शिंकली

मुहूर्ताच्या कारणावरून,
शपथविधी लांबला !
अंधश्रद्धा निर्मूलन कायदा 
जिथल्या तिथे थांबला !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------
चिमटा-2773
दैनिक पुण्यनगरी
9 नोव्हेंबर 2004

No comments:

नोटांचा संवाद... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका --------------------------- नोटांचा संवाद पाचशेची म्हणाली हजाराचीला, तुझी माझी आता रद्दी आहे. अर्थतज्ञाला नव्हती ...