Thursday, November 12, 2026

पक्षीय स्वच्छता अभियान... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-----------------------

पक्षीय स्वच्छता 
अभियान

एका राजकीय पक्षाने
पक्ष स्वच्छ करायचे ठरवले.
पक्षीय स्वच्छता अभियाने
मोठ्या थाटामाटात मिरवले.

कोण मोठा? कोण छोटा?
असे काहीच पाहिले नव्हते !
पक्ष स्वच्छ झाला तेंव्हा
पक्षात कुणीच राहिले नव्हते !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
---------------------
चिमटा-1951 
दै.पुण्यनगरी
27 जुलै 2009

No comments:

वात्रटिकांचा दीपोत्सवी दस्तऐवज!..दैनिक वात्रटिका – दीपोत्सव 2026

वात्रटिकांचा दीपोत्सवी दस्तऐवज! दैनिक वात्रटिका – दीपोत्सव 2026 संपादक : सूर्यकांत डोळसे मराठी साहित्याच्या प्रांगणात विनोद, उपर...