आजची वात्रटिका
------------------------------
11-11-11
मटकेवाले आणि मुहूर्तावाले,
यांचा काही नेम नसतो.
आकड्यांच्या मांडा-मांडी शिवाय,
दोघांचाही गेम नसतो.
मटका असो वा मुहूर्त,
सोयीनुसार शुभ अंक असतात !
आकडे जुळे असोत वा तिळे
त्यांच्या कल्पनेला पंख असतात !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4257
दै.झुंजार नेता
11 नोव्हेंबर 2011
No comments:
Post a Comment