Wednesday, November 11, 2026

युवा नेतेपद.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
----------------------

युवा नेतेपद

' युवक ' या शब्दावरतीही
राजकारणी  पोतारे फिरवतात.
युवा नेत्यांच्या पदावरही
म्हातारे कोतारे मिरवतात.

युवा नेत्यांची पैदासही
फक्त नेत्यांच्याच घरात असते !
शेंबड्या पोरांच्या खांद्यावरही
युवा नेतेपदाची वरात असते !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
---------------------
फेरफटका-3257 
दै.झुंजार नेता| 30 
जानेवारी 2009 

No comments:

राजकीय आत्मचरित्र... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटि

आजची वात्रटिका -------------------- राजकीय आत्मचरित्र  आत्मचरित्रातील काही मुद्दे ताजे,  काही वादग्रस्त आणि शिळे असतात. राजकीय आ...