Tuesday, November 10, 2026

लोकशाहीचा कंड... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका 
---------------------

लोकशाहीचा कंड 

या कोर्टातून ; त्या कोर्टात, 
लोकशाहीची धिंड आहे.
तरीही तुम्हा आम्हांला,
लोकशाहीचा कंड आहे.

तारीख पे तारीखचा,
लोकशाहीलाही फटका आहे.
कोर्टाचा मान राखावा, 
हा पवित्राही लटका आहे.

लोकशाहीच्या मार्गानेच,
लोकशाहीची टिंगल आहे!
सत्ता संपत्तीच्या जोरावरच,
लोकशाहीची दंगल आहे !!

-सूर्यकांत डोळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------
दैनिक वात्रटिका 
अंक 92 वा 
वर्ष- सहावे 
10 नोव्हेंबर 2026

No comments:

लोकशाहीचा कंड... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका  --------------------- लोकशाहीचा कंड  या कोर्टातून ; त्या कोर्टात,  लोकशाहीची धिंड आहे. तरीही तुम्हा आम्हांला, लो...