आजची वात्रटिका
--------------------
राजकीय आत्मचरित्र
आत्मचरित्रातील काही मुद्दे ताजे,
काही वादग्रस्त आणि शिळे असतात.
राजकीय आत्मचरित्र असतील तर,
त्यात जास्तच वादाची स्थळे असतात.
जसे विजयाचे आनंदी क्षण,
तसे पराभवाचे कडू घोट असतात.
साधे साधे प्रसंग सुद्धा,
गौप्यस्फोटावर गौप्यस्फोट असतात.
आत्मचरित्रांकडे बघण्याची,
ज्याची त्याची वेगळी भावना असते !
आत्मचरित्रांची मागची आवृत्ती,
पुढच्या आवृत्तीची प्रस्तावना असते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------------
दैनिक वात्रटिका
वर्ष सहावे
अंक 93 वा
11 नोव्हेंबर 2026
---------------------------
No comments:
Post a Comment