Thursday, November 12, 2026

कायमचे प्रश्न... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

कायमचे प्रश्न

मोर्चे, संप, उपोषणाबरोबर,
वेळप्रसंगी रक्तही सांडावे लागते. 
दुर्दैवाने त्याच त्याच प्रश्नांसाठी,
इथे पुन्हा पुन्हा भांडावे लागते.

तात्पुरते तोडगे काढण्यामुळे,
एकही प्रश्न कायमचा सुटत नाही ! 
सरकारी चालढकलीमुळे,
स्वातंत्र्य स्वातंत्र्य वाटत नाही!!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2776
दैनिक पुण्यनगरी
12 नोव्हेंबर 2011

No comments:

गुरु शिष्य... प्रसिद्ध वात्रटिकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- गुरू-शिष्य शिष्य म्हणविणारेच,  गुरूंचे 'गिऱ्हाईक' झाले.  अध्यात्मिक गुरूंचे, भरमस...