आजची वात्रटिका
-------------------------
पाकिस्तानचा साक्षात्कार
अखेर पाकिस्तानने मान्य केले
अजमल कसाब अतिरेकी आहे.
कळत नाही ही उपरती की,
पाकिस्तानची फेकाफेकी आहे?
पाकिस्तानच्या या साक्षात्काराचा,
आपण फायदा घ्यायला पाहिजे !
त्यांनी शब्द फिरवे पर्यंत,
कसाबला फाशी द्यायला पाहिजे!!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2775
दैनिक पुण्यनगरी
11 नोव्हेंबर 2011
No comments:
Post a Comment