Saturday, November 14, 2026

नसती बोंबाबोंब !... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका


आजची वात्रटिका 
---------------------

नसती बोंबाबोंब !

फाटाफूट आणि विलीनीकरण,
हा तर सृष्टीचाच नियम आहे.
सृष्टीच्या याच नियमावरती,
आपले सत्ताकारण कायम आहे.

सत्ताकारण हाच राजकारणाचा, 
मूलभूत असा आधारस्तंभ आहे !
तुमची आमची उगीचच, 
फाटाफूट आणि विलनीकरणावर,
विनाकारण बोंबाबोंब आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
 मोबाईल-9923847269
--------------------
दैनिक वात्रटिका 
अंक 97 वा 
वर्ष- सहावे 
14 नोव्हेंबर 2026

No comments:

दैनिक वात्रटिका l 14 नोव्हेंबर2026वर्ष- सहावेअंक - 97 वा l पाने -54

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blog...