Friday, November 13, 2026

प्रादेशिक भेदभाव...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------------

प्रदेशिक भेदभाव

कापूस म्हणाला ऊसाला, 
तुझ्या भावाचे कांडके आहे. 
मी तरी काय करणार? 
माझे कपाळच रंडके आहे.

कापसाच्या मनातील भाव,
ऊसाला बरोबर कळतो आहे! 
प्रादेशिक भेदभाव,
बोंडा-बोंडाला छळतो आहे !!

-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
    मोबाईल-9923847269
------------------------------
फेरफटका-4259
दै.झुंजार नेता
13 नोव्हेंबर 2011

No comments:

कुंभमेळा.... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ----------------------- कुंभमेळा संपला कुंभमेळा, संपले शाहीस्नान, पुढच्या सिंहस्थापर्यंत, पुन्हा साचायची घाण. कुं...