आजची वात्रटिका
-----------------------
अरे संसार संसार
तो पुरुषमुक्तीवादी,
ती स्रीमुक्तीवादी होती.
दोघांचा संसार म्हणजे
सगळी वादावादी होती.
दोघांच्या संघटनांची कार्यालये
घरात थाटलेली होती !
तरीही संसाराच्या वेलीला
भरपूर फुले फुटलेली होती !!
-सूर्यकांत डोळसे, पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------
फेरफटका-1002
दै.झुंजार नेता
6 नोव्हेंबर 2002
No comments:
Post a Comment