आजची वात्रटिका
---------------------
नसती बोंबाबोंब !
फाटाफूट आणि विलीनीकरण,
हा तर सृष्टीचाच नियम आहे.
सृष्टीच्या याच नियमावरती,
आपले सत्ताकारण कायम आहे.
सत्ताकारण हाच राजकारणाचा,
मूलभूत असा आधारस्तंभ आहे !
तुमची आमची उगीचच,
फाटाफूट आणि विलनीकरणावर,
विनाकारण बोंबाबोंब आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
--------------------
दैनिक वात्रटिका
अंक 97 वा
वर्ष- सहावे
14 नोव्हेंबर 2026