Sunday, November 15, 2026

महायुती... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची वात्रटिका


आजची वात्रटिका
-------------------------

महायुती

ज्याला महायुती म्हटले जाते,
ती प्रत्यक्षात तिघाडी आहे. 
वैचारिक पायाची तर,
बिघाडी एके बिघाडी आहे.

पाया पक्का नसला तरी,
उद्दिष्ट मात्र एक आहे ! 
तीन तिघाड्यांना जोडणारी,
महायुतीची मेख आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
चिमटा-2779
दैनिक पुण्यनगरी
15 नोव्हेंबर 2011

No comments:

पक्षांतर शास्त्र... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- पक्षांतर शास्त्र निवडणूकांच्या मोसमात, पक्षांतराची साथ असते.  एकमेकांच्या फोडाफोडीने, ...