Sunday, November 15, 2026

विग्रह ते संधी... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका


आजची वात्रटिका
--------------------

विग्रह ते संधी

वाट्टेल ते कर्ता कर्म लावून,
आपापले व्याकरण चालवले गेले.
भाव भावनांचे प्रयोग करीत, 
विभक्तीचे प्रत्यय खुलवले गेले.

कुणाचे नकारार्थी वाक्य होते,
कुणाचे होकारार्थी वाक्य होते. 
आजही विलीनीकरण शक्य आहे
कालही विलीनीकरण शक्य होते.

कुणी लावले उद्गारवाचक चिन्ह, 
कुणाकडून स्वल्पविराम ठेवला गेला !
विलीनीकरणाच्या प्रश्नचिन्हासमोर,
तात्पुरता पूर्णविराम लावला गेला !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9457
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता 
15 नोव्हेंबर 2026

No comments:

पक्षांतर शास्त्र... प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- पक्षांतर शास्त्र निवडणूकांच्या मोसमात, पक्षांतराची साथ असते.  एकमेकांच्या फोडाफोडीने, ...