Friday, April 24, 2026

बाई गं ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
बाई गं
किंतु आहे, परंतु आहे,
अगर आणि मगर आहे.
जिकडे बघावे तिकडे,
नारी शक्तीचा जागर आहे.
जसा एकीकडे जागर आहे,
तसा दुसरीकडे आक्रोश आहे.
राजकारण तर होतच राहणार,
त्यात कुणाचा काय दोष आहे?
मतदार संघ पुनर्रचना म्हणजे,
जेव्हाचे गहू तेव्हाच्या पोळ्या आहेत !
महिला आरक्षणाचे वास्तव बघून,
लोकशाहीच्या गाली खळ्या आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9257
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
24 एप्रिल 2026

 

No comments:

लपाछपीचा खेळ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- लपाछपीचा खेळ समाजकारणाआडचे राजकारण, लपविणे नेहमीच जड होत जाते. समाजकारणाआडचे राजकारण, कधी ना कधी उघड होत...