Thursday, April 9, 2026

तोंडावळा .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
तोंडावळा
सोयीनुसार तोंड बंद ठेवून,
सोयीनुसार तोंड उघडले जाते.
सामाजिक स्वास्थ्य तर,
दुतोंडीपणामुळे बिघडले जाते.
पाहिजे तेव्हा आळीमिळी,
नको तेव्हा आदळ आपट असते.
यावरून ओळखून घ्यावे,
कुणाच्या मनात किती कपट असते?
ज्याला कळायचे त्यालाच कळते,
कुणाची कशी तोंडावर आपटी आहे?
फुटलेले तोंडच सांगते,
कोण कसा आणि किती कपटी आहे?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-925
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
9 एप्रिल 2026

 

No comments:

विद्रुप राजकारण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- विद्रुप राजकारण विश्वासघातकी राजकारणाचा, आता पार कडेलोट होतो आहे. कुणीही कुणाला भेटला की, त्यातून संशयाच...