Saturday, April 4, 2026

पुतळ्यांचा पंचनामा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
पुतळ्यांचा पंचनामा
यांचा उभारा;त्यांचा हटवा,
उठता बसता एवढाच नाद आहे.
कोणत्या तरी पुतळ्यावरून,
सतत कुठे ना कुठे वाद आहे.
कुठे पुतळ्यासाठी मोर्चा,
कुठे पुतळ्यामुळे मोर्चा आहे
आदर्श घेतो;पुतळे आवरा,
अशी शहरा शहरात चर्चा आहे.
जेवढे वाढले पुतळे,
तेवढे वाढलेले उथळे आहेत !
शांतता आणि सुव्यवस्थेचे,
शहरा शहरात कोथळे आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9237
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
4 एप्रिल 2026
 

No comments:

सक्ती आणि भक्ती ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ सक्ती आणि भक्ती प्रत्येक भाषा वाढली पाहिजे, प्रत्येक भाषा टिकली पाहिजे. जिथे राहायचे,जिथले खाय...