आजची वात्रटिका
--------------------------
पक्षांतराचा फेरा
इकडे प्रवेश करून झाले,
तिकडे प्रवेश करून झाले.
बघता बघता सगळेच पक्ष,
आळीपाळीने फिरून झाले.
जेवढे ज्यांचे पक्षांतर अनुभव,
तेवढे त्यांना मुरब्बी मानले जाते.
पक्ष पक्षातील गद्दारांना,
बंडखोर म्हणून गणले जाते.
पहिले पक्षांतर विसरेपर्यंत,
दुसरे पक्षांतर होत आहे !
जे पक्ष फिरून फिरून भागले,
त्यांनाच निष्ठावंत म्हटले जात आहे!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9256
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
23 एप्रिल 2026

No comments:
Post a Comment