Thursday, April 16, 2026

कातडी बचाव .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
कातडी बचाव
वादग्रस्त घटनांकडेसुद्धा,
जो तो आपल्या सोयीने पाहतो आहे,
ज्याचा त्याचा घोडा सुद्धा,
वाहत्या गंगेत सोयीने न्हातो आहे.
इतरांचे नुकसान झाले तरी चालेल,
पण जो तो स्वतःची काळजी घेतो आहे.
ज्याचा त्याचा धोरणीपणा,
कातडी बचाव मध्ये पेंड खातो आहे.
गाव जले हनुमान बाहर...
सगळे काही हातचे राखूण आहे !
आपले उघडे पडू नये म्हणून,
दुसऱ्याचेसुद्धा झाकून पाकून आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9249
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
16 एप्रिल 2026

 

No comments:

कातडी बचाव .....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- कातडी बचाव वादग्रस्त घटनांकडेसुद्धा, जो तो आपल्या सोयीने पाहतो आहे, ज्याचा त्याचा घोडा सुद्धा, व...