Tuesday, April 7, 2026

दुटप्पी राजकारण.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
दुटप्पी राजकारण
राजकारणाची अवस्था,
नेमकी सांगू कशी आहे?
चोर सोडून संन्याशालाच,
इथे हमखास फाशी आहे.
कोण चोर ?कोण संन्याशी?
सोयीनुसार ठरवले जाते.
आपल्या सोयीचे राजकारण,
दरवेळी मिरवले जाते.
आपल्या सोयीचे नसले की,
त्यांच्या काळजाला रुतले जाते !
माकडीणीच्या गोष्टीप्रमाणे,
पिल्लूही पायाखाली घेतले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9240
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
7 एप्रिल 2026
----------------------------

 

No comments:

सक्ती आणि भक्ती ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ सक्ती आणि भक्ती प्रत्येक भाषा वाढली पाहिजे, प्रत्येक भाषा टिकली पाहिजे. जिथे राहायचे,जिथले खाय...