Friday, April 10, 2026

धर्मांध टोळ्या....आजची वात्रटिका .....दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
----------------------------
धर्मांध टोळ्या
ज्यांच्या ज्यांच्या मेंदूची कवाडे,
अगदी कायमस्वरूपी बंद आहेत.
असे एकदाच सगळेच,
अगदी शंभर टक्के धर्मांध आहेत.
अशा धर्मांधांच्या टोळ्याच,
धार्मिक म्हणून मिरवत आहेत !
आपल्या अस्तित्वासाठी,
परस्परांना नवे खाद्य पुरवत आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 125
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
10 एप्रिल 2026

 

No comments: