Wednesday, April 8, 2026

दुनिया झुकती है... ....आजची वात्रटिका

आजची वात्रटिका 
-----------------------------

दुनिया झुकती है...

जेवढे जेवढे गहाण ठेवलेले, 
भक्त लोकांचे मेंदू असतात.
तेवढे तेवढे समाजामध्ये, 
एकाचढ एक भोंदू असतात. 

भोंदूचे आणि गहाण मेंदूचे,
अतूट असे आंधळे प्रेम आहे !
दुनिया झुकती है म्हणत,
भोंदूंकडून भक्ताचा गेम आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
   मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 123
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
8 एप्रिल 2026

No comments:

सक्ती आणि भक्ती ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ सक्ती आणि भक्ती प्रत्येक भाषा वाढली पाहिजे, प्रत्येक भाषा टिकली पाहिजे. जिथे राहायचे,जिथले खाय...