Friday, April 3, 2026

पॉलिटिकल ऑपरेशन ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

पॉलिटिकल ऑपरेशन

खास सुत्र म्हणाले,बातमी पक्की,
कुणी कुणी म्हणाले, ही हूल आहे.
पुन्हा एका नव्या ऑपरेशनची,
सामान्य जनतेला नवी भूल आहे.

पॉलिटिकल ऑपरेशनच्या भुलीमध्ये,
सामान्य जनता सतत गुंग आहे.
सामान्य जनता शुद्धीवर येऊच नये,

असाच जणू राजकीय चंग आहे.
पॉलिटिकल ऑपरेशनच्या बातम्यांनी,
सगळेच हवालदिल झाले आहेत !
त्यांची अवस्था विचारायला नको,
ज्यांचे ज्यांचे टाके अजून ओले आहेत !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9236
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
3 एप्रिल 2026
----------------------------

 

No comments:

पॉलिटिकल ऑपरेशन ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- पॉलिटिकल ऑपरेशन खास सुत्र म्हणाले,बातमी पक्की, कुणी कुणी म्हणाले, ही हूल आहे. पुन्हा एका नव्या ऑ...