Sunday, April 26, 2026

चमत्कारिक दरबार ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
चमत्कारिक दरबार
जिकडे बघावे तिकडे,
भोंदू बाबांची धूम आहे.
बाबांच्या दरबारांची,
चमत्कारिक टूम आहे.
चमत्कारिक दरबारात,
चमत्कारिक दावे आहेत.
ज्याच्या त्याच्या दरबाराला,
ज्याची त्याची नावे आहे.
चमत्कारिक दरबारांचे,
चमत्कारीक कारभार आहेत!
संशयाच्या भोवऱ्यात,
बाबांचे दरबार आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9259
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
26 एप्रिल 2026

 

No comments:

दैनिक वात्रटिका l 25एप्रिल2026...वर्ष- पाचवे ....अंक -246 वा l पाने -57

दैनिक वात्रटिका खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेले पहिले आणि एकमेव ऑनलाईन दैनिक... संपादक-सूर्यकांत डोळसे suryakantdolase.blogspo...