Wednesday, April 8, 2026

अधोगती ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
अधोगती
अजून किती रसातळाला जायचे,
याचीच तर प्रचंड भीती आहे?
पक्ष पक्षाची माहिती नाही,
पण राजकारणाची अधोगती आहे.
कोण कृतज्ञ? कोण कृतघ्न?
विचारण्यामध्ये काही राम नाही.
कुणाची भूमिका आणि निष्ठा,
जेवढी पाहिजे तेवढी ठाम नाही.
राजकीय अधोगतीलाच,
विकासाच्या राजकारणाचे नाव आहे !
सगळा उलटा राजकीय प्रवास,
तरी राजकीय प्रगतीचा आव आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-924
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
8 एप्रिल 2026
----------------------------

 

No comments:

सक्ती आणि भक्ती ...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ------------------------------ सक्ती आणि भक्ती प्रत्येक भाषा वाढली पाहिजे, प्रत्येक भाषा टिकली पाहिजे. जिथे राहायचे,जिथले खाय...