Monday, April 6, 2026

तुलनात्मक लाळघोटेपणा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
-----------------------------
तुलनात्मक लाळघोटेपणा
नको त्यांची;नको त्यांच्याशी,
नको तशी तुलना केली जाते.
तुलना करायच्या नादामध्ये,
दुसऱ्याची अवहेलना केली जाते.
ना योग्य असतात भावना,
ना तुलनेत काही अर्थ असतो.
तुलनात्मक लाळघोटेपणात,
खुशमस्कऱ्यांचा स्वार्थ असतो.
एकाची उंची वाढवताना,
दुसऱ्याला मात्र खुजे केले जाते!
तुलनाही निष्कलंक नसते,
तुलनेतही अजेदुजे केले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9239
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
6 एप्रिल 2026

 

No comments:

नामांतराची टूम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- नामांतराची टूम कुठे नामविस्ताराचा तोडगा, कुठे नामांतराचे खुसपट आहे. ज्याचे दिले गेले नाव, त्याची हकनाक घ...