Saturday, April 4, 2026

भोंदूगिरी.....आजची वात्रटिका ....दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
----------------------------
भोंदूगिरी
जणू याचे त्याचे बघून,
सगळ्याच भोंदूंना स्फूर्ती आहे.
अगदी सगळ्याच क्षेत्रामध्ये,
भोंदूंची मोठी भरती आहे.
अध्यात्मातली वाढली तरी,
दुसरीकडे कुठे कमी होते आहे?
फक्त बुवा आणि बाबांचीच,
भोंदू म्हणून बदनामी होते आहे!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 120
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
4 एप्रिल 2026
 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...