Sunday, April 5, 2026

राजकीय समन्वय......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
राजकीय समन्वय
पोटनिवडणुकीच्या बिनविरोधावर,
सगळ्याच पक्षांचा जोर असतो.
राजकीय समन्वयावर,
सगळ्याच पक्षांचा भर असतो.
साट्या लोट्याच्या राजकारणात,
लोकशाहीलाही चंदन असते.
राजकीय अनुकंपा योजनेखाली,
जागाही एकमेकांना आंदण असते.
साट्या लोट्याच्या राजकारणात,
क्वचितच माशी शिंकली जाते !
पोटनिवडणूक बिनविरोध निघाली की,
म्हणे लोकशाही जिंकली जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9238
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
5 एप्रिल 2026

 

No comments:

राजकीय समन्वय......प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- राजकीय समन्वय पोटनिवडणुकीच्या बिनविरोधावर, सगळ्याच पक्षांचा जोर असतो. राजकीय समन्वयावर, सगळ्याच ...