आजची वात्रटिका
--------------------------
आप तो ऐसे ना थे
कालपर्यंतचे आम आदमी,
आज खास आदमी झाले.
अंध भक्तांच्या ओठावरती,
अचानक छद्मी हास्य आले.
आम आदमी पार्टी वरती,
जणू खराटा फिरवला आहे.
सांगा कालचा आम आदमी,
आज कुठे हरवला आहे?
दिल्लीपासून गल्लीपर्यंत,
सगळेच आता त्रस्त आहेत!
पुन्हा जुनाच आरोप,
गेलेले सगळे ईडीग्रस्त आहेत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9260
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
27 एप्रिल 2026

No comments:
Post a Comment