आजची वात्रटिका
----------------------------
लेबल
प्रकरण कोणतेही असो,
जाती-धर्माने बाधले जात आहे.
कोणत्याही गोष्टींमध्ये,
जाती धर्माला शोधले जात आहे.
जाती-धर्माच्या लेबलशिवाय,
प्रकरण चिघळत आणि सडत नाही.
जाती धर्माचे लेबल लावले की,
समर्थकांचीही कमी पडत नाही.
आज प्रत्येकाच्याच हातामध्ये
आपल्या जाती धर्माची ढाल आहे !
यशस्वीतेची गॅरंटी आल्यामुळे,
पुन्हा पुन्हा तीच तीच चाल आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9243
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
10 एप्रिल 2026

No comments:
Post a Comment