Friday, April 17, 2026

नारीशक्ती वंदन ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
नारीशक्ती वंदन
नाहीतरी नारीशक्तीचे आरक्षण,
नेहमीच पुरुषांना आंदण आहे.
तरीही नव्या आरक्षणासाठी,
तमाम नारीशक्तीला वंदन आहे.
जसे आंदण आहे;वंदन आहे,
तेहतीस टक्क्यांचे बंधन आहे.
कारभाऱ्याकडून कारभारणीला,
अगदी राजरोसपणे चंदन आहे.
बायकोला अंगठा दाखवीत,
नवरा सह्याजीराव झाला आहे !
नाव लोकशाहीचे असले तरी,
नवरेशाहीचाच बोलबाला आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-9250
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
17 एप्रिल 2026

 

No comments:

निर्धार पक्का !....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- निर्धार पक्का ! मराठी शाळांच्या बदनामीचा, सगळीकडूनच डाव आहे. साहेबीपणाचा आव आणीत, इंग्रजी शाळांकडे...