Thursday, April 2, 2026

खरात बाबा पुराण.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------

खरात बाबा पुराण

महाराष्ट्राच्या डोळ्यात आग आहे,
मोठी खंत महाराष्ट्राच्या उरात आहे.
महाराष्ट्राच्या पुरोगामीत्वाची वरात,
भोंदू बाबा खरातच्या दारात आहे.

अनेक जणी फसवल्या गेल्या आहेत,
अनेक जणी नासवल्या गेल्या आहेत.
भोळ्या भक्तांना मधाचे बोट लावून,
त्यांची बुडंही बसवल्या गेल्या आहेत.

कधी नागोबा;कधी वाघोबा,
चिंचोक्यांनाही रत्नांचा भाव आहे !
चक्क मुताऱ्याचा उतारा केला,
पाजलेल्या पाण्याचे ओश्नोजल नाव आहे !!

-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9235
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
2 एप्रिल 2026
----------------------------

 

No comments:

राजकीय किडा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- राजकीय किडा टोकरत राहतो;पोखरत राहतो, असा राजकीय किडा असतो. कधी अंतर्गत, कधी बाहेर, त्याचा राडा एके...