Tuesday, April 7, 2026

थापालॉजी....आजची वात्रटिका ....दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
----------------------------
थापालॉजी
जरी राजकारणाची विसंगती,
आपण वेळोवेळी पाहिली आहे.
तरी अशी एकही थाप नसेल,
त्यांच्याकडून मारायची राहिली आहे.
थापालॉजी आणि फेकॉलॉजी,
यावरतीच राजकारणाची भिस्त आहे!
सामान्य जनतेचे जगणे मरणे,
राजकारण्यांसाठी खूप स्वस्त आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 122
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
7 एप्रिल 2026
 

No comments:

नामांतराची टूम....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- नामांतराची टूम कुठे नामविस्ताराचा तोडगा, कुठे नामांतराचे खुसपट आहे. ज्याचे दिले गेले नाव, त्याची हकनाक घ...