Saturday, April 18, 2026

प्रतिगामित्वाची खोड.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
प्रतिगामित्वाची खोड
परंपरा आणि संस्कृती म्हणून,
प्रतिगामित्व पाळले जात आहे.
परंपरेचे सच्चे पाईक म्हणून,
पुरोगामित्व टाळले जात आहे.
कळतंय पण वळत नाही,
अशीच एकंदर अवस्था आहे.
प्रतिगामित्व जोपासले जाईल,
अशीच एकंदर व्यवस्था आहे.
सुंभ जळाले तरी पिळ जात नाही,
अशी प्रतिगामित्वाची खोड आहे !
विरोधाला विरोध म्हणून,
त्याला धार्मिक कट्टरतेची जोड आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-9251
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
18 एप्रिल 2026

 

No comments:

प्रतिगामित्वाची खोड.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- प्रतिगामित्वाची खोड परंपरा आणि संस्कृती म्हणून, प्रतिगामित्व पाळले जात आहे. परंपरेचे सच्चे पाईक ...