आजची वात्रटिका
----------------------------
महिला आरक्षण विधेयक
महिला आरक्षण विधेयकासारखा,
दुसरा कोणताच घोळात घोळ नाही.
विधेयकामुळे कोण हरले कोण जिंकले?
याचा कुणालाच कसला मेळ नाही.
आरक्षण विधेयकाच्या नामंजुरीचे,
एकमेकांच्या डोक्यावर खापर आहे.
सगळ्याच बाजूने गलका होतोय,
महिलांचा राजकारणासाठी वापर आहे.
महिला आरक्षण विधेयकाच्या तळाशी,
देशातील मतदार संघ पुनर्रचना आहे !
कुणी दिले ओपन चॅलेंज,
कुणाची उलट सुलट सूचना आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका-9254
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
21 एप्रिल 2026

No comments:
Post a Comment