Sunday, April 19, 2026

चमत्कार.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
----------------------------
चमत्कार
एकापेक्षा एक खतरनाक,
बाबा पकडले जाऊ लागले.
एकापेक्षा एक खतरनाक,
बाबा उघडकीस येऊ लागले.
भोंदू बाबांच्या भक्तांची,
उडालेली दाणादाण आहे.
तरीही मान्य करावे लागेल,
महाराष्ट्र भोंदूंची खाण आहे.
भोंदू बाबांच्या अटकेचे दुःख,
भक्त पचवू शकले नाहीत!
इतरांना वाचवणारे बाबा,
स्वतःला वाचवू शकले नाहीत !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
----------------------------
फेरफटका-9252
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
19 एप्रिल 2026

 

No comments:

चमत्कार.....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- चमत्कार एकापेक्षा एक खतरनाक, बाबा पकडले जाऊ लागले. एकापेक्षा एक खतरनाक, बाबा उघडकीस येऊ लागले. भ...