Monday, April 6, 2026

सेम टू सेम....आजची वात्रटिका ....दैनिक मराठवाडा नेता

आजची वात्रटिका
----------------------------
सेम टू सेम
आयपीएल आणि राजकारण,
दोघातही खूप एकवाक्यता असते.
नवा सिझन;नवे खेळाडू,
दोन्हीकडे खूप मोठी शक्यता असते.
खरेदी विक्री आणि फोडाफोडी,
ही बाब नित्याची झाली आहे !
एकीकडे एकवार्षिक तर,
दुसरीकडे पंचवार्षिक बोली आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
आजची वात्रटिका - 121
वर्ष - पहिले
दैनिक मराठवाडा नेता
6 एप्रिल 2026
 

No comments:

विद्रुप राजकारण....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------- विद्रुप राजकारण विश्वासघातकी राजकारणाचा, आता पार कडेलोट होतो आहे. कुणीही कुणाला भेटला की, त्यातून संशयाच...