Monday, May 11, 2026

घुसखोर जिंदाबाद !...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
घुसखोर जिंदाबाद !
घुसखोरांपेक्षा पाठीराख्यांचे,
आज खरोखर धोके आहेत.
पुन्हा पुन्हा सिद्ध होऊ लागले,
घुसखोरांचेही पाठीराखे आहेत.
घुसखोरांच्या पाठराखणीमुळे,
घुसखोर नको तिथे घुसले आहेत.
उघड आणि छुप्या पाठिंबामुळे,
घुसखोर सर्वत्र पोसले आहेत.
घुसखोरांच्या घुसखोरीला,
पाठीराख्यांकडून मोठी दाद आहे !
पाठीराख्यांच्या उन्मादामुळेच,
घुसखोर जिंदाबाद आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9273
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
11 मे 2026

 

No comments:

घुसखोर जिंदाबाद !...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- घुसखोर जिंदाबाद ! घुसखोरांपेक्षा पाठीराख्यांचे, आज खरोखर धोके आहेत. पुन्हा पुन्हा सिद्ध होऊ लागले,...