आजची वात्रटिका
--------------------------
चॉकलेटी आनंद
फक्त एका चॉकलेटमुळे,
बघा केवढी खळबळ माजू शकते ?
फक्त एका चॉकलेट वरती,
गद्दारी आणि देशभक्ती मोजू शकते.
देणाऱ्याला द्यावे वाटले,
घेणाऱ्यालाही घ्यावे वाटले आहे.
फक्त एका चॉकलेट मुळे,
देशात मोठे वादळ उठले आहे.
चॉकलेटच्या देण्या घेण्यावरून,
जो तो वेगळाच राग आळवतो आहे!
केवळ चॉकलेट चघळून चघळून,
चॉकलेटी आनंद मिळवतो आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9283
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
21 मे 2026

No comments:
Post a Comment