Saturday, May 30, 2026

राजकीय किडा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
राजकीय किडा
टोकरत राहतो;पोखरत राहतो,
असा राजकीय किडा असतो.
कधी अंतर्गत, कधी बाहेर,
त्याचा राडा एके राडा असतो.
वळवळत राहतो;कळवळत राहतो,
स्थिरतेच्या नावाने शून्य असतो.
सतत गुणगुण करण्यामध्येच.
राजकीय किडा धन्य असतो.
कुणाच्याही मागे लागावे म्हणून,
त्याला वाऱ्यावर सोडले जाते !
ज्याला लागला राजकीय किडा,
त्याचे तर भुस्कट पडले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9292
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
30 मे 2026

 

No comments:

राजकीय किडा...प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- राजकीय किडा टोकरत राहतो;पोखरत राहतो, असा राजकीय किडा असतो. कधी अंतर्गत, कधी बाहेर, त्याचा राडा एके...