आजची वात्रटिका
--------------------------
काटकसरी व्हा !
इंधन काटकसरीचा मार्ग,
आपल्यासाठी खूप सोपा आहे.
तुमच्या आमच्या मागे पुढे,
कुठे वाहनांचा ताफा आहे?
तेलकट बिलकट तर,
आधीच कुणी खाऊ देत नाही.
मग देशभक्तीची आयती संधी,
सांगा,आपण का बरे घेत नाही?
सरकारी वाहनेच वापरा,
कुठे आपले परदेश दौरे आहेत?
दागिने खरेदीच्या हट्टामधून,
सुटलेले देशभक्त नवरे आहेत !
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 92757
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
15 मे 2026

No comments:
Post a Comment