आजची वात्रटिका
--------------------------
युद्ध आणि तह
टंचाईपासून बचतीपर्यंत,
लोकांवरती बारी आहे.
तिकडे आणि इकडेही,
युद्धप्रसंग जारी आहे.
महागाईच्या पोटामध्ये,
टंचाईच्या कळा आहेत.
लोकांच्या आयुष्याला,
युद्धाच्या झळा आहेत.
युद्धखोर देशांचा,
एकमेकांना शह आहे !
युद्धग्रस्त लोकांचा,
रोज जगन्याशीच तह आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 92756
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
14 मे 2026

No comments:
Post a Comment