Tuesday, May 26, 2026

विलीनीकरणाचा मुद्दा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
विलीनीकरणाचा मुद्दा
इकडूनही मुद्दा ताणला जातो,
तिकडूनही मुद्दा ताणला जातो.
विलीनीकरणाच्या कढीला,
पुन्हा पुन्हा उत आणला जातो.
ते म्हणतात चर्चा लांबली आहे,
हे म्हणतात चर्चा थांबली आहे.
विलीनीकरणाच्या चर्चेला तर,
जनता पूर्णपणे आंबली आहे.
विलीनीकरणाचा मुद्दा,
राजकीय आणि भावनिक आहे !
काठावरच्या कार्यकर्त्यांना,
जणू विलीनीकरणाचे टॉनिक आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9288
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
26 मे 2026

 

No comments:

विलीनीकरणाचा मुद्दा....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- विलीनीकरणाचा मुद्दा इकडूनही मुद्दा ताणला जातो, तिकडूनही मुद्दा ताणला जातो. विलीनीकरणाच्या कढीला, प...