आजची वात्रटिका
--------------------------
झुरळ
कुणाला वाटला उपरोधिकपणा,
कुणाला वाटले ही गरळ आहे.
आरटीआय कार्यकर्ता म्हणजे,
न्यायाधीशांच्या मते झुरळ आहे.
कुणाला वाटते आहे ते सत्य आहे,
कुणाला वाटते हे तर मिथ्य आहे.
माय लॉर्ड, झुरळ म्हणजे...
पृथ्वीवरचे अंतिम सत्य आहे.
तुमची उपमा तशी रम्य आहे,
त्यामुळेच आमच्या मते क्षम्य आहे!
झुरळ मिशा हलवीत म्हणाले,
तुमच्या आमच्या नावात साम्य आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9279
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
17 मे 2026

No comments:
Post a Comment