Sunday, May 3, 2026

निकालाची टक्केवारी....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
निकालाची टक्केवारी
आपल्या गुणवत्तेची परिमाणे,
पारंपरिक आणि पक्के आहेत.
निकाल विचारायला लावतो,
कुणाला किती टक्के आहेत?
ज्याची टक्केवारी जास्त,
त्यालाच हुशार मानले जाते.
विद्यार्थ्यांच्या अपयशाचे गणित,
टक्केवारीवरती आणले जाते.
यशाला आणि अपयशालाही,
टक्केवारीमध्येच मोजले जाते !
हे युग स्पर्धेचे आहे म्हणीत,
टक्केवारीलाच पुजले जाते !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
9265
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
3 मे 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...