Sunday, May 10, 2026

काळया शाईची घुसखोरी ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
काळया शाईची घुसखोरी
ज्याला त्याला निषेधाची,
नको नको तेवढी घाई आहे.
निषेधाच्या कार्यक्रमासाठी,
पेनमधली काळी शाई आहे.
काळया शाईची फेकाफेक,
जणू लोकशाही मार्ग आहे?
फेकाफेकीचे समर्थन करणारा,
प्रत्येकाचा पाठीराखा वर्ग आहे.
खऱ्याला खरे; खोट्याला खोटे,
म्हणायचीही सध्या चोरी आहे !
निषेधाच्या लोकशाही मार्गात,
काळया शाईची घुसखोरी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9272
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
10 मे 2026

 

No comments:

काळया शाईची घुसखोरी ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका -------------------------- काळया शाईची घुसखोरी ज्याला त्याला निषेधाची, नको नको तेवढी घाई आहे. निषेधाच्या कार्यक्रमासाठी, पेनम...