आजची वात्रटिका
--------------------------
आचार विचार
भ्रष्टाचाऱ्यांच्या अनुभवातून,
इतरांनीही काही शिकावे लागते.
खाणारा कोणीही असला तरी,
त्याला कधीतरी ओकावे लागते.
कधी उशिरा;कधी लवकर,
एवढाच काय तो फरक असतो.
भ्रष्ट स्वर्ग सुखाच्या वाट्याला,
कधी ना कधी नरक असतो.
कुणाला नकारात्मक वाटला तरी,
आमचा हा सकारात्मक विचार आहे !
ज्याने त्याने आत्मपरीक्षण करावे,
आपला नेमका कोणता आचार आहे?
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9270
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
8 मे 2026

No comments:
Post a Comment