Friday, May 29, 2026

ज्याचे त्याचे पर्व ....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका
--------------------------
ज्याचे त्याचे पर्व
अमुक पर्व, तमुक पर्व,
याचाच भक्तांना गर्व आहे.
नेत्याची तळी उचलण्यात,
अंधभक्तांचे सर्व आहे.
अमुक पर्व, तमुक पर्व,
हे सर्वपक्षीय सत्य आहे.
नावे आणि काळ बदलतात,
बाकी सर्व नित्य आहे.
अमुक पर्व, तमुक पर्व,
याचीच बॅनरबाजी आहे !
कुठलाही भुकेला कोल्हा,
नेहमी काकडीला राजी आहे !!
-सूर्यकांत डॊळसे,पाटोदा(बीड)
मोबाईल-9923847269
-------------------------------
फेरफटका- 9291
वर्ष-26 वे
दैनिक झुंजार नेता
29 मे 2026

 

No comments:

षडयंत्र....प्रसिद्ध वात्रटिकाकार व्याख्याते सूर्यकांत डोळसे यांची मराठी वात्रटिका

आजची वात्रटिका ---------------------------- षडयंत्र शांतता आणि सुव्यवस्थेला सगळीकडूनच धक्का आहे. साध्या साध्या प्रकरणांवरही, जाती धर्माचा शि...